MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

लाॅकडाऊन च्या काळात महाविद्यालयाने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले त्या मागे एकच हेतू होता तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. याच धर्तीवर दिनांक १ जून२०२० ते ४ जून २०२० या चार दिवसात आठ सत्रात B.Ed.CET मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले . सदर वेबिनार श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन ,नविन पनवेल व मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री धनराजजी विसपुते , मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस च्या डायरेक्टर मा. डाॅ. सुनिता मगरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. सीमा कांबळे मॅडम, आणि त्यांचा सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. झूम वर १०० विद्यार्थ्यांना तर youtube वर २१० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.